शालिग्राम
*शाळीग्राम* *विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते.* नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे. विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते. या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते. *शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी* हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीर या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा --------------------------------------------------- *शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे* -------------------------------------------------- १) शुभ्र – वासुदेव २) निळा -हिरण्यगर्भ ३) काळा – विष्णू ४) तांबडा – प्रद्युम्न ५) गडद हिरवा –...